मुंबई

वाढत्या उष्णतेने मुरबाडकर हैराण

CD

मुरबाड, ता. १४ (वार्ताहर) : सध्या मुरबाड तालुक्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. एप्रिल-मे मध्ये जाणवणारी उष्णता यंदा अधिक तीव्र झाली आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यावर फिरणेही नागरिकांसाठी कठीण बनले आहे. उष्ण वारे आणि गरम हवेमुळे शेतकरी, कामगार, व्यापारी; तसेच विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे.
तालुक्यात वाढत चाललेले सिमेंटचे रस्ते, माती व डोंगर उत्खनन, झपाट्याने कमी होणारी झाडांची संख्या आणि वाढता पर्यावरणीय असमतोल वाढत्या तापमानामागील प्रमुख कारणे आहेत. अनेक ठिकाणी विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते; मात्र त्या बदल्यात लावलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. बहुतांश रोपे काही महिन्यांतच सुकून जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. फक्त झाडे लावून छायाचित्रे काढणे पुरेसे नाही, तर ती जगवण्यासाठी कठोर कायदे आणि जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले. वाढत्या कार्बन उत्सर्जनाचा परिणाम ग्रामीण भागांपर्यंत पोहोचत असून पूर्वी थंड हवामानासाठी ओळखला जाणारा मुरबाडही आता तीव्र उष्णतेच्या संकटाचा सामना करत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने वृक्षसंवर्धनासाठी कठोर धोरण राबवणे, अनियंत्रित उत्खननावर नियंत्रण आणणे, मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आणि पर्यावरणपूरक विकासकामांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.

परिणाम
दुपारच्या वेळेत बाजारपेठा ओस पडत असून, नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. ग्रामीण भागातील शेतमजूर, बांधकाम कामगार आणि रस्त्यांवर काम करणाऱ्या मजुरांची अवस्था अधिक बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाईही जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT