मुंबई

अतिवृष्टी, पूर संकटांसाठी टीडीआरएफ मैदानात

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : आगामी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थिती, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटांचा प्रभावीपणे सामना करता यावा, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने आपत्कालीन तयारीला वेग दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या टीडीआरएफ जवानांकडून विशेष प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष बचाव सराव सुरू करण्यात आला आहे.
पूरपरिस्थितीत नागरिकांचे तातडीने स्थलांतर आणि बचावकार्य प्रभावीपणे करता यावे, यासाठी जवानांना बोट चालविणे, पोहणे; तसेच पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली असून आठवड्यातून एकदा मासुंदा तलाव परिसरात प्रत्यक्ष सराव घेतला जात आहे. या प्रशिक्षणात टीडीआरएफच्या २९ जवानांचा सहभाग आहे.
मान्सून काळात अतिवृष्टी, दरड कोसळणे, इमारत दुर्घटना; तसेच खाडीलगतच्या भागांमध्ये भरतीमुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र टीडीआरएफ पथक उभारले आहे. मागील वर्षी एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली या जवानांना विशेष प्रशिक्षण दिले होते. त्यामध्ये प्रथमोपचार, पूरस्थितीतील बचावकार्य, डोंगराळ भागातील मदतकार्य, आग नियंत्रण, दरड दुर्घटना आणि इमारत कोसळल्यास करावयाच्या उपाययोजनांचा समावेश होता.
दरम्यान, यंदाही त्याच धर्तीवर बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. पूरग्रस्त भागांत बोटींच्या साह्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, भरतीच्या वेळी पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे; तसेच आपत्कालीन मदत तातडीने पोहोचविण्यासाठी जवानांना विशेष सराव दिला जात आहे.

२२ बोटी सज्ज
महापालिकेकडून यंदा २२ बोटी सज्ज ठेवल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या मालकीच्या पाच, तर खासगी १७ बोटींचा समावेश आहे. साध्या बोटींसोबत पॅडल आणि मशिन बोटींचीही व्यवस्था केली आहे. मशिन बोटींद्वारे एका वेळी २५ नागरिकांचे बचावकार्य करणे शक्य होणार आहे.
……………….
तलाव परिसरात बोटी तैनात
मासुंदा तलाव, कचराळी तलाव, हरियाली तलाव, जेल तलाव, रेवाळे, कोलबाड, कळवा, आंबेघोसाळे, कौसा, खिडकाळी, दिवा आणि दातिवली या भागांमध्ये बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्‍भवल्यास त्वरित प्रतिसाद देता यावा यासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

हायलाईट्‍स
* २९ टीडीआरएफ जवानांचा सहभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT