मुंबई

पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या

CD

पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या
वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतला माॅन्सूनपूर्व कामांचा आढावा
वाशी, ता. १३ (बातमीदार)ः आगामी पावसाळ्यात नवी मुंबईतील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत महापालिका प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले. वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये पार पडलेल्या या बैठकीत माजी खासदार संजीव नाईक, महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, नगर अभियंता शिरीष आरदवाड, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू नये आणि पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश वनमंत्री नाईक यांनी दिले.
पावसाळ्यात शॉर्टसर्किटमुळे जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये, यासाठी उघड्या विजेच्या तारा, डीपी बॉक्स, ट्रान्स्फॉर्मर आणि धोकादायक विद्युत यंत्रणांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.
शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शाळा इमारतींची दुरुस्ती पूर्ण करावी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की नाही, याची तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुसळधार पावसामुळे डोंगर परिसरातून मातीचे लोंढे खाली येऊन दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले. पावसाळ्यात साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या रुग्णालयांमधून नवी मुंबईतील रुग्णांना प्राधान्याने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशदेखील वनमंत्री नाईक यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT