मुंबई

श्रमजीवीच्या पाठपुराव्याला यश ;

CD

बेघर कुटुंबाला हक्काचे घर!
श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

वाडा, ता. १३ (बातमीदार) ः शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने आंबिस्ते खुर्द येथील एका कातकरी कुटुंबावर उघड्यावर संसार थाटण्याची वेळ आली होती; पण श्रमजीवी संघटनेमुळे अखेर या कुटुंबाला घर दुरुस्तीसाठी एक लाख २० हजारांचा निधी मंजूर झाल्याने हक्काचा निवारा मिळाला आहे.
तालुक्यातील आंबिस्ते खुर्द (देवळाची वाडी) येथील रहिवासी कै. पुंडलिक दिवा यांची पत्नी, चार मुलांसह गेली अनेक वर्षे कुणाच्या तरी मंडपात, नातेवाईक किंवा मंदिरात आश्रय घेऊन राहत होते. वर्षानुवर्षे ऊन, वारा, पाऊस, कडाक्याच्या थंडीत उघड्यावर वास्तव्य करावे लागत होते. ही बाब श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्ता ॲड. प्रशांत काशिद यांच्या निदर्शनास आल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला. वाडा गटविकास अधिकारी वैभव शिंदे तसेच ग्रामपंचायत आंबिस्तेचे ग्रामसेवक भास्कर आंधळे यांच्या मदतीने अखेर कुटुंबाला हक्काचे पक्के घर मिळवून देण्यात यश आले आहे. प्रशासनाकडून जुने मोडलेले घर दुरुस्ती आणि पडझड निधीअंतर्गत एक लाख २० हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली. त्यामुळे कायमचा आसरा मिळाला आहे.
---------------------------
मोलाचे योगदान
श्रमजीवी संघटनेचे वाडा तालुकाध्यक्ष भरत जाधव, सचिव सूरज दळवी, उपाध्यक्ष आदेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. यामध्ये गणप्रमुख नितीन सवर, गणपत सवर, ॲड. प्रशांत काशिद यांनी विशेष परिश्रम घेत मोलाची कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT