मुंबई

मुख्य रस्त्यावरील मॅनहोलची झाकणे निखळल्याने अपघाताची भीती

CD

मुख्य रस्त्यावरील मॅनहोलची झाकणे निखळल्याने अपघाताची भीती

मालाड, ता. १३ (बातमीदार) ः मालवणीतील गावदेवी मार्ग ते राठोडीदरम्यान मुख्य रस्त्यावरील तब्बल दहा ते बारा मॅनहोलची झाकणे निखळल्याने परिसरात अपघाताची भीती निर्माण झाली आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार, रिक्षा, छोटे टेम्पो तसेच ट्रकचालकांकडून केला जातो. याशिवाय आसपासच्या परिसरातील रहिवासीही दैनंदिन ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे उघड्या मॅनहोलमध्ये पादचारी किंवा वाहनचालक पडून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राठोडी, खारोडी तसेच मालवणी गेट क्रमांक आठ येथून मार्वे रोडकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग मानला जातो. परिणामी, येथे दिवसभर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. विशेषतः दुचाकी, ऑटो आणि पादचाऱ्यांची सतत ये-जा सुरू असते.
या समस्येबाबत अनेक वेळा पालिकेकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे; मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लवकरात लवकर नव्या मॅनहोल झाकणांची बसवणूक करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी स्थानिक रहिवासी, पादचारी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT