मुंबई

देहेनला जोडणाऱ्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत

CD

देहेनला जोडणाऱ्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत
ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

पोयनाड, ता. १३ (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील देहेन गावाला जोडणारा पूल अर्धवट अवस्थेत आहे. देहेन गावाच्या वेशीला लागूनच असलेल्या या पुलाची अक्षरशः दुर्दशा झाली असून नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून हे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास यामुळे सहन करावा लागत आहे.
या पुलाचे बांधकाम कमकुवत झाल्याने काही महिन्यांपूर्वी येथून जड वाहने आणि चारचाकी यांना प्रवेश बंद करण्यात आला होता. आता मात्र या जुन्या पुलाच्या जागी नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून काम अत्यंत संथ गतीने आणि दिरंगाईने सुरू आहे. पूल पूर्णपणे मोडला असून बाजूने मातीच्या भरावावरून ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून दिला असून चारचाकी वाहने देहेन गावच्या वेशीपर्यंत नेण्यास पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. देहेन गावाच्या दृष्टीने दळणवळणाच्या बाबतीत हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलावरून देहेन, श्रीगाव, मेढेखार, सुकटणे, कुर्डुस, नागोठणे या भागातील प्रवासी ये-जा करीत असतात.
ऐन पावसाळा तोंडावर आला असून या पुलाचे काम अत्यंत दिरंगाईने सुरू असल्याने ग्रामस्थांसमोर संकट उभे राहिले आहे. पावसाळ्यात या नदीला पूर आल्यास गावाचा संपर्क पूर्णपणे तुटण्याची भीती असून विद्यार्थी, रुग्ण, सर्वसामान्य नागरिक, दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी यांना पूल नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच आपत्कालीन परिस्थितीत गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. रात्रीच्या वेळेस गुगल मॅप लावून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुलाचे काम सुरू असल्याची माहिती नसल्यास आणि पावसाळ्यात दृश्यमानता काम असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती वर्तवली जात आहे.
यासंदर्भात देहेनकोनी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून संबंधित विभागाने या पुलाच्या कामामध्ये लक्ष घालून पुलाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा, शनिवारी (ता. १६) सकाळपासून अलिबाग-पेण राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


- मुक्या जनावरांना धोका
- देहेनला जोडणाऱ्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने दुग्धव्यवसाय करणाऱ्या नागरिकांची जनावरे पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- पावसाळ्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करावी
नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने आणि गावाला पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता पावसाळ्याआधी पुलाचे काम पूर्ण तरी करावे किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT