उलवेत दगड फोडण्यासाठी विनापरवाना स्फोट
त्रिकूटावर उलवे पोलिसांची मोठी कारवाई
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : विनापरवाना स्फोटकांचा वापर करून दगड फोडण्याचा प्रकार उलवे परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी उलवे पोलिसांनी मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून एक लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जयदिप खोत, लालुसिंग राठोड व गणेश जाधव या तिघांनी १० व ११ मे या दरम्यान उलवे येथील सेक्टर -२६, प्लॉट नं. ३६७ आणि ३६८ येथील दगड फोडण्यासाठी घातक स्फोटकांचा वापर करून ब्लास्टिंग केले. यासाठी आरोपींनी कोणत्याही शासकीय विभागाची परवानगी घेतली नव्हती. या प्रकारची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी दोन संशयास्पद डिटोनेर वायरचे तुकडे आणि स्फोटक पदार्थांचे अंश असलेली माती आढळून आली. त्यानंतर पोलिसानी या ठिकाणावरून दीड लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, डिटोनेर वायरचे तुकडे तसेच स्फोटक पदार्थांचे अंश असलेली माती व इतर तांत्रिक साहित्य जप्त केले.
आरोपींनी या ठिकाणी स्फोटकांचा बेकायदेशीरपणे वापर करून ब्लास्टिंग केले, त्यामुळे परिसरातील मानवी जीविताला मोठा धोका निर्माण झाल्याने पोलिसांनी स्वतः या प्रकरणात फिर्यादी होऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी जयदिप खोत याला ताब्यात घेऊन बी.एन.एस.एस. कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक अजित कणसे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.