मुंबई

सफाई कामगारांच्या ग्रॅच्युईटीसाठी श्रमजीवीचा एल्गार

CD

सफाई कामगारांच्या उपदानासाठी श्रमजीवीचा एल्गार

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : वारंवार मागणी करूनही कंत्राटदाराकडून ग्रॅच्युइटीच्या (उपदान) थकबाकीची रक्कम मिळत नसल्याने मिरा-भाईंदर महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. तब्बल एक हजार ६०० सफाई कर्मचाऱ्यांनी ग्रॅच्युइटीच्या रकमेची मागणी करणारे अर्ज बुधवारी (ता. १३) रांग लावून महापालिका मुख्यालायत जमा केले.

महापालिकेने नियुक्त केलेल्या ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट या कंत्राटदाराकडे हे सफाई कर्मचारी २०१२ कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. ग्रॅच्युइटी अधिनियमानुसार ज्या कामगाराने आस्थापनेमध्ये सलग पाच वर्षांपेक्षा किंवा त्यापेक्षा अखंडित सेवा केलेली आहे, तो उपदानास पात्र ठरतो. उपदान देणे कायद्याने बंधनकारक असताना कंत्राटदार कंपनीने एक हजार ६०० कामगारांची ग्रॅज्युइटी थकवली असल्याचे श्रमजीवी संघटनेचे म्हणणे आहे. मृत व सेवानिवृत्त १२० कामगारांच्या ग्रॅच्युइटीची मागणी करणारे प्रस्ताव कंत्राटदाराकडे देण्यात आले असून, त्यांच्यावतीने मात्र मोजके १० ते १२ प्रस्तावच मंजूर करण्यात आले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या परिवाराला त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी कामगारांनी जिवंत असतानाच ग्रॅच्युइटी देण्याची मागणी केली आहे. सर्व कामगारांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर जमून आपले अर्ज जमा केले. एक हजार ६०० कामगारांची ग्रॅज्युइटी सरसकट आणि त्वरित मिळावी ही प्रमुख मागणी या अर्जांमधून करण्यात आली आहे.
-----------------
पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार

आम्ही दिवस-रात्र शहर स्वच्छ ठेवतो. मात्र, आमच्या हक्काचे पैसे देण्यास कंत्राटदार कंपनीचा मुजोर ठेकेदार टाळाटाळ करत आहे, अशा शब्दांत सफाई कामगारांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. येत्या सात दिवसांत ग्रेज्युइटीवर निर्णय न घेतल्यास श्रमजीवी कामगार संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांच्या नेतृत्वाखाली पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती संघटनेचे मिरा-भाईंदर अध्यक्ष मंगेश दत्ताराम मोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT