मुंबई

घरांच्या करपावती हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावावा

CD

घरांच्या करपावती हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावावा
माजी नगरसेवक जगदीश गवते यांची प्रशासनाकडे मागणी
वाशी, ता. १३ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी व गावठाण विभागातील घरांच्या करपावती हस्तांतरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश नाना गवते यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करपावती हस्तांतरण प्रक्रिया बंद असल्याने हजारो घरमालकांना विविध प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी व गावठाण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरांची खरेदी-विक्री झाली आहे. अनेक नागरिकांनी आपली घरे विकत घेतली असून, प्रत्यक्षात ते त्या घरांमध्ये राहात आहेत. मात्र, २०१४ पासून करपावती हस्तांतरण प्रक्रिया बंद असल्यामुळे संबंधित घरांच्या कर पावत्या अद्याप जुन्या मालकांच्या नावावरच आहेत. परिणामी नवीन घरमालकांना मालकी हक्क सिद्ध करणे, बँक कर्ज प्रक्रिया, वारस नोंदणी, वीज-पाणी जोडणी, कायदेशीर कागदपत्रे तयार करणे तसेच इतर शासकीय कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

चौकट
विशेष मोहीम राबवावी
गवते यांनी आपल्या सूचनेत म्हटले आहे की, नवी मुंबईतील हजारो कुटुंबे या समस्येमुळे त्रस्त असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाल्यास महापालिकेच्या करवसुलीतही वाढ होण्यास मदत होईल. अनेक नागरिक नियमित कर भरण्यास तयार असले तरी नाव बदलाची प्रक्रिया बंद असल्याने त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने विशेष मोहीम राबवून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT