मुंबई

ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदासाठी चुरस

CD

पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदासाठी सध्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. या महत्त्वाच्या नियुक्तीकडे संपूर्ण पोलिस दलाचे लक्ष लागले आहे. डॉ. डी. एस. स्वामी यांची २ मे रोजी नाशिक पोलिस अधीक्षकपदी बदली झाल्यानंतर १० ते १२ दिवसांपासून ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपद रिक्त आहे. या पदासाठी पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बदली आदेशांमध्ये डॉ. डी. एस. स्वामी यांची नाशिक येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी २ मे रोजी नाशिक पोलिस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. तेव्हापासून ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांच्याकडे आहे. मात्र, अद्याप या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती जाहीर केलेली नाही. अनुभव आणि प्रशासकीय कामकाजाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही अधिकारी सक्षम मानले जात असले, तरी अंतिम निर्णय वरिष्ठ स्तरावर होणार असल्याने ठाणे ग्रामीणच्या पुढील पोलिस अधीक्षकपदी नेमकी कोणाची नियुक्ती होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कामकाजाचा अनुभव
डॉ. विनयकुमार राठोड हे २०१७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून सध्या छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात त्यांनी परिमंडळ-५ चे पोलिस उपायुक्त; तसेच वाहतूक विभागाचा पदभार सांभाळला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर ते राज्यभर चर्चेत आले होते. ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजाचा त्यांना अनुभव आहे.
अविनाश अंबुरे हे २०१८ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून, सध्या एसआयपीएफ मुंबई युनिटचे कमांडंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ठाणे ग्रामीण पोलिस दलात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केले असून ठाणे शहर आणि वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील कामकाजाचाही त्यांना अनुभव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT