मुंबई, ता. १३ : जगातील सर्वांत मोठ्या कॅट शोपैकी एक असलेल्या कॅट एक्स्पो इंडिया नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भरणार आहे. फेलाइन क्लब ऑफ इंडियाने रविवारी (ता. १७) आयोजित केलेल्या या प्रदर्शनात ६०० हून अधिक प्रजातींच्या मांजरींचा समावेश असणार आहे.
मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘एफसीआय’चे अध्यक्ष साकिब पठाण यांनी या एक्स्पोबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संस्थेचा हा सहावा कॅट शो असून, आजपर्यंत झालेल्या प्रदर्शनाने अनेक विक्रम मोडले आहेत. या चॅम्पियनशिप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड येथील न्यायाधीश सहभागी होणार असून, ते विविध मान्यताप्राप्त जातींच्या मांजरींचे मूल्यांकन करणार आहेत.
इंडीमाऊ
या शोच्या माध्यमातून ६०० हून अधिक मांजरी पाहण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये पर्शियन, बंगाल, एक्सोटिक शॉर्ट हेअर, मेन कून आणि इतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त जातींच्या मांजरींचा समावेश असेल. संस्थेने भारतीय भटक्या मांजरींची ‘इंडीमाऊ’ या नावाने नोंदणी करून त्यांना मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भारतीय मूळच्या मांजरींचा या कॅट शोमध्ये सहभाग वाढण्यास मदत होईल. तसेच स्थानिक जातींना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळेल, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
मांजरी दत्तक घेण्याची संधी
या प्रदर्शनात मुलांसाठी फन झोन, मांजरींच्या देखभालीवरील शैक्षणिक सत्रे, पाळीव प्राणी मालकांसाठी जनजागृती उपक्रम आणि भेट देणाऱ्यांना ब्रीडर्स, पशुवैद्यक तसेच कॅट तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. प्राणी कल्याण आणि कॅट रेस्क्यूशी संबंधित स्वयंसेवी संस्थाही या कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यामार्फत लोकांना मांजरी दत्तक घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रदर्शन हॉलमध्ये ६० हून अधिक स्टॉल्स उभारले जाणार आहेत. यामध्ये पाळीव प्राण्यांचे अन्न, ग्रूमिंग उत्पादने, ॲक्सेसरीज, आरोग्यसेवा आणि इतर कॅट-संबंधित उत्पादनांशी संबंधित कंपन्यांचा समावेश असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.