मुंबई

पनवेलमध्ये तीव्र पाणीटंचाई

CD

पाणीटंचाईविरोधात रविवारी कामोठ्यात जनमोर्चा

पनवेल, ता. १३ (बातमीदार) ः पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाई दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून रविवारी (ता. १७) कामोठे येथे शांततामय जनमोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची कायदेशीर पूर्वसूचना प्रशासनाला देण्यात आली आहे.
पनवेल पालिका क्षेत्रातील २९ गावे आणि मूळ शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाढती लोकसंख्या, नव्या वसाहती आणि औद्योगिक व नागरी विस्तार यामुळे विद्यमान पाणीपुरवठा अपुरा ठरत आहे. नवी मुंबई पालिकेकडे सुमारे १०० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध असल्याची माहिती समोर येत असून त्यापैकी किमान ३० एमएलडी पाणी पनवेल क्षेत्रासाठी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. यासंदर्भात महापौर, आयुक्त, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांकडे निवेदन देऊनही अद्याप ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी व पाणीप्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजता कामोठे येथील पाणीपुरवठा केंद्रावर शांततामय जनमोर्चा व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हा मोर्चा पूर्णपणे लोकशाही मार्गाने व संविधानिक चौकटीत पार पडणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा
पनवेल महापालिका क्षेत्रास तातडीने ३० एमएलडी अतिरिक्त पाणी मंजूर करावे, २९ गावांसाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी जलयोजना जाहीर करावी, पाणीपुरवठ्यातील अनियमितता तातडीने थांबवावी, मागणीप्रमाणे टँकर पाणीपुरवठा तत्काळ अग्रक्रमाने करण्यात यावा व पुढील कालावधीत टँकर अबलंबित्व कमी करून नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजन करावे, सिडको, पनवेल महापालिका, नवी मुंबई महापालिका अन्य संबंधित यंत्रणा यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करावी. या प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT