मुंबई

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला विरोध

CD

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला विरोध
पालिका आयुक्तांकडे निवेदन, प्रशासनाने विश्वासात न घेतल्यामुळे तुर्भेकर नाराज
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : तुर्भे येथील स्टोअर डम्पिंग ग्राउंडवर नवी मुंबई महापालिकेकडून प्रस्तावित सीबीजी (कंप्रेस्ड बायोगॅस) आणि ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. नागरिकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत बुधवारी (ता. १३) शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
शिवसेना नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती सुरेश शिवाजी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात नगरसेविका अबोली कुलकर्णी, सविता सांगळे, सविता लगाडे, माजी नगरसेविका संगीता वास्के तसेच अन्य स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी सादर करण्यात आलेल्या लेखी निवेदनात प्रकल्पाबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप करण्यात आला. नागरिकांच्या शंका दूर केल्या नाहीत, तर जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
स्थानिक नागरिकांनी विशेषतः पर्यावरणीय परिणाम आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या एसआरए अंतर्गत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेला या प्रकल्पामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या सुमारे ५०० मीटर ‘बफर झोन’मुळे परिसरातील बांधकामांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
याशिवाय प्रकल्पातून निर्माण होणारा धूर, राख व इतर प्रदूषणामुळे स्थानिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार अशा प्रकल्पांच्या आसपासच्या परिसरात निवासी विकासावर मर्यादा येऊ शकतात. परिणामी, एसआरए अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या इमारतींना तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी हा प्रकल्प अत्याधुनिक व प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानावर आधारित असून शहराच्या हिताचा असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करूनच प्रकल्प पुढे नेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

कोट :
नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करूनच प्रकल्प राबवला जाईल. हा प्रकल्प शहराच्या हिताचा असून, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
– डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

चौकट :
बफर झोनचा पुनर्वसनावर परिणाम
सीबीजी आणि ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पांसाठी आवश्यक असलेला ५०० मीटर बफर झोन हा परिसरातील एसआरए प्रकल्पांसाठी मोठा अडथळा ठरू शकतो. या झोनमध्ये येणाऱ्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना तांत्रिक मंजुरी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. परिणामी, रहिवाशांना अन्यत्र स्थलांतरित करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

बॉक्स
पर्यावरण आणि आरोग्याच्या चिंता
प्रकल्पातून निर्माण होणारा धूर, राख आणि इतर घटकांमुळे हवेचे प्रदूषण वाढण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करूनच प्रकल्प राबवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT