मुंबई

बदल्यांविरोधात एल्‍गार

CD

बदल्यांविरोधात एल्‍गार
जे. जे. रुग्‍णालयात परिचारिकांनी वेधले प्रशासनाचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : जागतिक परिचारिका दिन साजरा होत असताना महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मात्र परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात सर जे. जे. समूह रुग्णालय येथे बुधवारी (ता. १३) गेट बैठक आयोजित करण्यात आली होती. परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी शेकडो परिचारिकांचा आवाज जे. जे. रुग्णालयात घुमला.
या आंदोलनाबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या मुंबई उपाध्यक्षा हेमलता गजबे यांनी सांगितले की, प्रशासनाकडून परिचारिकांच्या होणाऱ्या सरसकट प्रशासकीय बदल्यांमुळे त्यांचे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे. हे अन्यायकारक धोरण थांबवण्यासाठी आणि इतर न्याय्य हक्कांसाठी हा लढा उभारण्यात आला आहे. संघटनेने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आपल्‍या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
आम्ही रुग्णसेवा अहोरात्र करतो. मात्र, आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याचा विचार शासनाने गांभीर्याने करावा, अशी भावना या वेळी उपस्थित परिचारिकांनी व्यक्त केली. त्याचवेळी आझाद मैदानावरील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सरसकट बदल्यांना विरोध
परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या न करता केवळ ‘विनंती’ आणि ‘तक्रार’ आधारित बदल्या कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

९० टक्‍के महिला कर्मचारी
परिचारिका संवर्गात ९० टक्‍के महिला आहेत. सहा वर्षांनी होणाऱ्या बदल्यांमुळे मुलांचे शिक्षण आणि वृद्ध आई-वडिलांच्या संगोपनात मोठ्या अडचणी येत आहेत.

कौटुंबिक स्थैर्य
प्रशासकीय बदल्यांमुळे अनेक संसार विखुरले जात असून, महिला कर्मचाऱ्यांचे मोठे मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. केरळ उच्च न्यायालयानेही महिलांच्या बदलीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे निर्देश दिले आहेत, याचा दाखला निवेदनात देण्यात आला आहे.

राज्‍यव्यापी आंदोलनाचा इशारा
मागण्या मान्य न झाल्यास १८, १९ आणि २० मे असे तीन दिवस आझाद मैदान येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT