मुंबई

वेगमर्यादेमुळे अपघाताचा धोका

CD

वेगमर्यादेमुळे अपघाताचा धोका

मनोर, ता. १३ (बातमीदार) : या महामार्गावरील वेगमर्यादा ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाढवली आहे. तसेच हा महामार्ग निकृष्ट दर्जाच्या व्हाइट टॉपिंगच्या कामामुळे धोकादायक बनला असून, येथील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. व्हाइट टॉपिंगच्या कामानंतर महामार्गाचे समतल राखण्यात अपयश आले आहे. भरधाव वेगातील वाहने महामार्गावर उसळी घेत असल्यामुळे महामार्गावरून वाहने चालवताना चालकांची तारांबळ उडत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, काही महिन्यांपूर्वी पूर्ण झालेल्या व्हाइट टॉपिंगच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महामार्गावरील वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचा पृष्ठभाग समतोल राखण्यात आल्याने वाहने उसळी घेत असल्याचा अनुभव वाहनचालकांना येत आहे. वेगमर्यादा वाढवण्यात आल्याने शंभर किलोमीटर प्रती तास वेगमर्यादेच्या वेगात चालवताना वाहनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
महामार्गावरील काही भागात रस्त्यावर कंपन जाणवत असल्याने वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. लेनच्या शिस्तीचा नियम अवजड वाहनचालकांकडून पाळला जात नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. रात्रीच्या वेळी धावणारी अवजड वाहने महामार्गाच्या असमतोल पृष्ठभागामुळे अचानक डावीकडे किंवा उजवीकडे झुकत असल्याची तक्रार आहे.

महामार्गावर वळणाचा भाग असलेल्या ठिकाणी वाहनांच्या वेग नियंत्रणासाठी उपाययोजना नसल्याने अपघातांची शक्यता वाढत आहे. महामार्गावरील वेगमर्यादा ८० ते १०० किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे, परंतु महामार्गाच्या असमतल पृष्ठभागामुळे वेगमर्यादा धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही महामार्गाचा दर्जा राखण्यात अपयश आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पथकाने महामार्गाची पाहणी करून महामार्गाच्या पृष्ठभागात असलेले तांत्रिक दोष दूर करण्यासाठी उपाययोजना केल्यानंतर वेगमर्यादेत बदल करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT