मुंबई

‘नीट’ने राज्यातील पालक-विद्यार्थ्यांत चिंता

CD

मुंबई, ता. १३ : राज्य शिक्षण मंडळाने नीटच्या परीक्षेचा निकाल दुसऱ्याच दिवशी असताना बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामुळे राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना त्यामुळे मानसिक तणावाखाली नीटची परीक्षा द्यावी लागली, तर काहींनी बारावीत गुण कमी पडल्याने नीटच्या परीक्षेकडे दुर्लक्ष केले होते. अशा स्थितीत ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली, त्या विद्यार्थ्यांमध्ये ही परीक्षा रद्द झाल्याने आणि या परीक्षेत गैरप्रकार समोर आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

देशभरात घेण्यात आलेली नीटची परीक्षा रद्द झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभर विविध तंत्राचा अवलंब तसेच कठोर परिश्रम करून नीटच्या परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आता ही परीक्षा पुन्हा होणार असल्याने अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, या काळात विद्यार्थ्यांचे मनोबल चांगले राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नीटची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना वारंवार पडताळणी प्रक्रियेतून जावे लागते; पण प्रणालीच सुरक्षित राहिली नाही. ‘परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे चार-पाच वेळा बायोमेट्रिक घेतले जाते; पण स्वतःची यंत्रणा सुरक्षित ठेवण्यात अपयश आले. या पुनर्परीक्षेमुळे मुलांवर अधिक दबाव निर्माण होत आहे,’ अशा स्थितीत त्यांच्यावर पुन्हा परीक्षा लादली जाणार असल्याने यासाठी होणाऱ्या मानसिक त्रासासाठी कोण जबाबदार आहे, असा सवाल पालक संघटनेच्या दीपाली सरदेसाई यांनी केला.

मुळात बारावीच्या परीक्षेच्या आधारावरच विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय आणि सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश करणे आवश्यक आहे. मात्र, काही मूठभर श्रीमंतांच्या मुलांसाठी देशातील लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यासाठी या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा आणल्या गेल्या आहेत. शिवाय एनटीए ही केंद्राची एजन्सी दाखवली जात असली तरी एजन्सीकडे स्वत:ची कोणती सक्षम यंत्रणा नाही, हे ‘नीट’च्या पेपर फुटी प्रकरणातून समोर आल्याचेही सरदेसाई म्हणाल्या.

राज्यातील २.७ लाख विद्यार्थी
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए)ने नुकतेच नीटची परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. या नीटच्या परीक्षेत परीक्षेपूर्वीच सुमारे ६०० गुणांचे प्रश्न फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यंदा ही परीक्षा भारतातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ५,४०० हून अधिक केंद्रांवर घेण्यात आली होती. देशभरातून सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिली होती, त्यापैकी जवळपास २.७ लाख विद्यार्थी महाराष्ट्रातील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT