वज्रेश्वरी, ता. १३ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यात आगीच्या घटना, पावसाळी आपत्ती; तसेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी वर्षातील ३६५ दिवस कार्यरत राहणारी कायमस्वरूपी ‘जलद कृती टीम’ स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, ठाणे यांनी संबंधित सर्व विभागांना दिले आहेत. अप्पर आयुक्त (महसूल) तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, कोकण विभाग यांच्या आदेशानुसार हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर महापालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते, सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती व्यवस्थापक, टोरेंट पॉवर लिमिटेड तसेच नागरी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. राष्ट्रीय मानव हक्क मंचचे अध्यक्ष शरद धुमाळ यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात वाढणाऱ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कायमस्वरूपी जलद कृती टीम स्थापन करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्यक आदेश निर्गमित केल्याने शरद धुमाळ यांच्या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.