मुंबई, ता. १३ : आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सतर्फे ‘ॲक्टिव्ह युवा’ हा नवा आरोग्य विमा बाजारात आणला असून, तंदुरुस्त, फिट असलेल्या व्यक्तींना यात अनेक सवलती दिल्या जातील.
विमा पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांनी पुरेशी झोप घ्यावी, पुरेशा व्यायाम करावा, सकस अन्न खावे हा या पॉलिसीचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी पॉलिसीधारकांना सवलतीही दिल्या जातील. यासंदर्भातील ॲपवर या सर्व नोंदी कराव्या लागतील व त्यानुसार त्यांना त्यावरील सवलती मिळतील.
रोज १० हजार पावले चालणाऱ्या किंवा व्यायामशाळेत जाऊन एकाच सत्रात ३०० कॅलरी खर्च करणाऱ्या आणि सात ते आठ तास झोप घेणाऱ्यांना प्रीमियममध्ये वेगवेगळ्या सवलती मिळतील. या व्यक्तींचा आरोग्यपूर्ण हृदय गुणांक चांगला असला, तर त्यांना त्यांचा भरलेला संपूर्ण वार्षिक प्रीमियम परत दिला जाईल. ही माहिती आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचे सीईओ मयांक बथवाल यांनी दिली.
या पॉलिसीमध्ये विमाछत्र ११ वर्षांत ११ पट वाढू शकते, तर औषधे, रोगनिदान, वैद्यकीय सल्ला याचे छत्र पाच पट मिळू शकते. पॉलिसीधारक परदेशात गेल्यास त्याला तेवढ्या कालावधीसाठी हप्ता न भरण्याची सुविधाही मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.