सीईटी कार्यालयासमाेर काॅँग्रेसचे आंदाेलन
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : ‘नीट’ पेपरफुटीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करा. या प्रकाराची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी मुंबई युवक काँग्रेसने फोर्ट परिसरातील सीईटी कार्यालयासमोर मुंबईत जोरदार आंदोलन केले. अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
झीनत शबरीन म्हणाल्या, की ‘नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नांवर सरकारने बुलडोझर फिरवला आहे. या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.’
आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज चौधरी, महासचिव तेजस चांदूरकर, आसिफ खान, गुरमन सिंग, गणेश शेगार, मितेश सोनकर, संतोष यादव, जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, शिव यादव, अब्दुल समद तसेच इम्रान खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
---
भाजपशी संबंधित साखळी!
प्रश्नपत्रिका फुटीमागील संपूर्ण साखळी भाजपशी संबंधित लोकांकडून चालवली जात आहे. बेकायदा मार्गाने विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले जात असल्याचा आरोप शबरीन यांनी केला. ज्या एनटीए महासंचालकांच्या कार्यकाळात २०२४ची ‘नीट’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली, त्याच व्यक्तीची छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे ‘प्रधान सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.