मुंबई

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर जलदगतीने कार्यवाही करा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाणे महापालिकेतील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अडचणी, पदोन्नती, वेतन, निवृत्तीवेतन, आश्वासित प्रगती योजना, ग्रॅज्युइटी, वैद्यकीय सुविधा तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.

महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विविध कर्मचारी संघटनांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांबाबत महापौरांकडे निवेदने सादर केली होती. त्यानंतर या विषयांवर प्रशासनासमवेत चर्चा करण्यासाठी अरविंद पेंडसे सभागृहात विशेष बैठक झाली. बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, मधुकर बोडकरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि आस्थापना विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. निवेदने सादर केलेल्या काही कर्मचाऱ्यांना बैठकीत समक्ष बोलावून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. प्रशासनाने सर्व विषयांचा सकारात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करून टप्प्याटप्प्याने निर्णय घ्यावेत, असे निर्देश महापौर पिंपळोलकर यांनी दिले. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासन संवेदनशीलपणे काम करेल, असे आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी दिले. बैठकीला श्रमिक जनता संघ, म्युनिसिपल लेबर युनियन, कामगार एकजूट संघटना, टीएमटी एम्प्लॉईज युनियन, ठाणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ तसेच ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रलंबित मागण्यांवर चर्चा
बैठकीत अग्निशमन विभागातील पदोन्नती, रिक्त पदे भरणे, लिपिक व टंकलेखक पदांवरील पदोन्नती, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन, सातवा वेतन आयोग, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देयके, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन तसेच विविध विभागांतील प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; पण रक्कम पाहून महिलांना बसला धक्का!

HBA Interest Rate: घर खरेदी-बांधणीसाठी स्वस्त कर्जाचा फायदा कायम! HBA व्याजदरात वाढ नाही; सरकारचा मोठा निर्णय

"आम्ही विभक्त होतोय" अखेर मौनी आणि सूरजने घटस्फोटावर सोडलं मौन ! पण नेटकऱ्यांनी धरलं या अभिनेत्रीला जबाबदार

Deglur Police : राजकीय व्यासपीठावरील शुभेच्छांचा फटका; देगलूरचे पोलीस निरीक्षक मुंडे बदली

Beed News: बीडमध्ये पंडित शिरले, क्षीरसागर चांगलेच तापले! नेमकं काय घडलं? बघाच..

SCROLL FOR NEXT