वैद्यकीय तपासणी मूलभूत अधिकार
न्यायालयाची नरेश गोयल यांना लंडनवारीची परवानगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना त्यांच्या गंभीर आजारावर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी चार आठवड्यांकरिता लंडनला जाण्याची विशेष न्यायालयाने नुकतीच सशर्त परवानगी दिली. वैद्यकीय तपासणी आणि तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यासाठी परदेशी प्रवास करण्याचा मूलभूत मानवी अधिकार असल्याचे न्यायालयाने नमूद करून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटल्यांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी गोयल यांची विनंती मान्य केली.
विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीला वैद्यकीय तपासणी आणि तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यासाठी परदेश प्रवास करण्याचा मूलभूत मानवी अधिकार असल्याचे न्यायालयाने नमूद केले. ड्युओडेनम न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या प्राणघातक आजाराशी गोयल लढा देत आहेत. त्यासोबतच त्यांना हृदयविकारासह इतर अनेक व्याधी जडल्या आहेत. पत्नीच्या निधनानंतर गोयल यांना नैराश्य येऊन त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डाेकाऊ लागल्याचा युक्तिवाद वरिष्ठ वकील आबाद पोंडा यांनी केला.
कॅनरा बँकेच्या सार्वजनिक निधीचा वापर करून ५,७१६ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात ७७ वर्षीय गोयल हे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याचिकेला विरोध केला आहे. गोयल यांची परदेशात माेठी मालमत्ता असून, मुलगा निवान गोयल लंडनमध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे ते परदेशात पळून जाण्याची शक्यता ईडीने व्यक्त केली हाेती.
----
न्यायालय म्हणाले...
- उच्च न्यायालयाने गोयल यांना कायदेशीररीत्या आजारी आणि अशक्त म्हणून वर्गीकृत केल्याची नोंद न्या. रोटे यांनी घेतली.
- लंडनस्थित वेलिंग्टन रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे २७ मे २०२६ रोजी गोयल यांना भेटीची वेळ आहे. त्यांच्या आजाराचे स्वरूप पाहता तपासणी व्हीसीद्वारे करणे शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
- अंतरिम जामिनावर असताना गोयल यांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा, सवलतींचा कधीही गैरवापर केलेला नाही. त्यामुळे ते पळून जाण्याची किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याची जोखीम कमी असल्याचे नमूद न्यायालयाने नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.