मुंबई

आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी

CD

आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी!
कोलाडची सपना उच्च शिक्षणासाठी लंडनला
रोहा, ता. १३ (बातमीदार) ः जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर चमकू शकतात, हे रोहे तालुक्यातील कोलाड येथील सपना वाघमारे हिने सिद्ध केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या ग्लोबल स्कॉलरशिप प्रोग्रॅम अंतर्गत सपनाची युकेमधील नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स आणि क्वीन मेरी युनिव्हर्सिटी येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.
सपना वाघमारे ही रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड येथील रहिवासी असून, ती कातकरी समाजातील अत्यंत दुर्गम भागातील विद्यार्थिनी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि आर्थिक अडचणींवर मात करत तिने हे यश संपादन केले आहे. आपल्या मुलीने जागतिक स्तरावर शिक्षणासाठी झेप घेतल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सपनाने अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग (ठाणे) यांच्या अधिपत्याखालील हडपसर (पुणे) येथील शासकीय वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण केले. या ठिकाणी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, गृहपाल अर्चना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकलव्य फाउंडेशनमार्फत मिळालेल्या शैक्षणिक मार्गदर्शनामुळे सपना वाघमारे हिने परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि त्यात तिने उज्ज्वल यश मिळविले. सपना वाघमारे हिच्या यशस्वी कामगिरीबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे व सर्व पक्षीय नेते मंडळी व कोलाड ग्रामस्थ मंडळा कडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Cabinet Instructions : सार्वजनिक वाहतूक, विमान प्रवासावर मंत्र्यांना बंधणे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाला सूचना

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

आजचे राशिभविष्य - 14 मे 2026

Sattu Buttermilk Recipe: उन्हाळ्याच्या कडाक्यात शरीराला आतून थंडावा देणारं सुपर देसी ड्रिंक! घरच्या घरी झटपट बनवा 'सत्तूचं ताक'

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

SCROLL FOR NEXT