मुंबई

थोडक्यात

CD

थोडक्यात

‘समाज एकत्र येणे काळाची गरज’
रोहा (बातमीदार) : नामदेव शिंपी समाजाने एकत्र येऊन सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे मत रायगड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी व्यक्त केले. रोहे येथे झालेल्या वार्षिक सभेत ते बोलत होते. विविध भागांतील समाजबांधव कार्यक्रम, सभा व विवाहसोहळ्यांतून एकत्र येतात, असे त्यांनी सांगितले. सभेत शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी विषयांवर चर्चा झाली. कार्यक्रमास दत्तात्रय पांढरकामे, अरुण करंबे, प्रेषित बारटक्के, हेमंत बारटक्के यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
-----------------------------------------------
‘प्रतिभेच्या वाटेवर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
अलिबाग (वार्ताहर) : जागतिक मातृदिनानिमित्त कवी प्रथमेश कासार यांच्या ‘प्रतिभेच्या वाटेवर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. इरा व मायरा इशांत भगत यांनी शिवतांडव स्तोत्र व कृष्णगीत सादर केले. प्रास्ताविक वैभव धनावडे यांनी केले, तर स्मिता हर्डीकर यांनी निवेदन केले. अध्यक्ष प्रा. एल. बी. पाटील यांनी साहित्य चळवळीचे कौतुक केले. संजय गुंजाळ, रमेश धनावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लालसिंग वैराट, श्रीकांत पेटकर, दिलीप मोकल, मयूर पालकर, दीप्ती कुलकर्णी यांनी कविता सादर केल्या. संध्या दिवकर, सिद्धेश लखमदे यांनी शुभेच्छा दिल्या.
--------------------------------------------
खारघरमध्ये रविवारी आध्यात्मिक सोहळा
खारघर (बातमीदार) : विहंगम योग संस्थानातर्फे रविवार (ता. १७) सेक्टर २९ येथील गावदेवी मंदिराजवळ आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन वाराणसीहून आलेल्या बटूंनी वैदिक मंत्रोच्चारात केले. सोहळ्यात १००१ कुंडीय वैदिक हवन-यज्ञ होणार असून, संतप्रवर विज्ञानदेव व सदगुरू स्वतंत्रदेव महाराज मार्गदर्शन करणार आहेत. किशनलाल शर्मा, योगेश पाटील, बजरंगलाल बजारी, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर खरपुरिया, मधु पाटील, ब्रिजेश पटेल, शिवम सिंह, संजय शर्मा उपस्थित होते. कार्यक्रम निःशुल्क असून, महाप्रसादाची व्यवस्था आहे.
----------------------------------
शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा
खारघर (बातमीदार) : पंचशील बुद्ध विहारात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा १०४ वा स्मृतिदिन व्याख्यान व ग्रंथप्रदर्शनाने नुकताच साजरा झाला. अध्यक्षस्थानी दिपा जयप्रकाश शहारे होत्या. ॲड. अरुण सुखाडे यांनी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी असलेले संबंध यावर मार्गदर्शन केले. अशोक शेलारे व एकनाथ ढंगारे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास एल. डी., प्रकाश तायडे, उत्तम मुगदल, राजेंद्र मानवतकर, रवि बोरकर, राजेंद्र गायकवाड, बौद्धाचार्य हिरामण थोरात यांच्यासह अनेक उपासक उपस्थित होते.
--------------------------------------------
ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील सुविधा वाढवा
नेरूळ (बातमीदार) : पाम बीच (सोनखार) येथील ज्येष्ठ नागरिक सेवा समितीच्या सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विरंगुळा केंद्रांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत नुकतेच निवेदन सादर केले. नवी मुंबईतील विविध विभागांमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे सुरू करण्यात आली असली तरी वाढत्या सदस्य संख्येनुसार त्या सुविधांचा विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचे समितीने नमूद केले आहे. ‘शारदामाई धर्माधिकारी उद्यान’ येथील विरंगुळा केंद्रात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक येत असल्याने केंद्राची जागा वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच केंद्रासाठी कॅरम, बुद्धिबळ यांसारखे खेळ साहित्य, कार्यालयीन खुर्च्या, कपाट, सदस्यांसाठी पुरेशी आसनव्यवस्था आणि टीव्ही संच उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
----------------------------------------------
ह.भ.प. नकुल महाराज भोईर यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार
तुर्भे (बातमीदार) : नवी मुंबई येथील कोपरी गावातील कीर्तनकार ह.भ.प. नकुल महाराज भोईर यांचा पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने मंगळवारी (ता. १२) राज्यस्तरीय आदर्श कीर्तनकार पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ह.भ.प. नकुल महाराज भोईर हे नवी मुंबई, रायगड, ठाणे आदी परिसरात कीर्तन सेवा देत असून, आपल्या कीर्तनातून सामाजिक संदेश देत समाज प्रबोधनाचे कार्य करीत आले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सदर पुरस्कार देण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रीतम म्हात्रे, महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्षा डॉ. स्मिता अजय पाटील, उपाध्यक्ष आरती पाटील, सचिव दिव्या लोकरे, अरविंद म्हात्रे तसेच परेश पाटील, डॉ. अशोक म्हात्रे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यात

Paithan Wari: पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान; गोदावरी काठी भाविकांची गर्दी

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Latest Marathi News Update : पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT