मुंबई

तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ

CD

तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ

मुंबई, ता. १५ : देशभरात तंबाखूमुक्त समाज निर्माण करणे आणि मुलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या सहकार्याने ‘तंबाखूमुक्त आणि निरोगी बालक - इंडिया व्हिजन’ या अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत नरोटम सेखसरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘नरोटम सेखसरिया फाउंडेशन ग्रँट्स अँड अवॉर्ड्स २०२६’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय मोहिमेची सुरुवात २००८ मध्ये झाली. आतापर्यंत या अभियानांतर्गत ३९ स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) सहाय्य देण्यात आले असून, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६० व्यक्तींना गौरविण्यात आले आहे. संस्थेच्या माहितीनुसार, या मोहिमेच्या माध्यमातून देशातील १३ राज्यांमधील सुमारे १५ लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले असून, पाच हजार ५०० हून अधिक शाळांना तंबाखूमुक्त घोषित करण्यात आले आहे.

तसेच ‘टोबॅको-फ्री स्कूल प्रोग्राम २०२६-२७’ अंतर्गत चार संस्थांना अनुदान देण्यात आले. त्यामध्ये बालाजी सेवा संस्थान, जनलोक कल्याण परिषद, धरती ग्रामोथान एवं सहभागी ग्रामीण विकास समिति आणि ग्रामीण स्वावलंबन समिति यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT