मुंबई

नीट पेपरफुटी प्रकरण :

CD

नीट पेपरफुटी प्रकरण : 

शुभम खैरनारला
ट्रान्झिट कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी नाशिकमध्ये अटक केलेल्या शुभम खैरनार (वय ३०)ला बुधवारी (ता. १३) मुंबईतील महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. न्यायालयाने शुभमला केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) दोन दिवसांची ट्रान्झिट कोठडी सुनावली. त्यानंतर सीबीआयने खैरनारला दिल्लीला नेले. 

नाशिक जिल्ह्यातील नांदगावचा रहिवासी असलेल्या खैरनारला सीबीआयने मंगळवारी (ता. १२) रात्री उशिरा ताब्यात घेऊन त्याला बुधवारी (ता. १३) सकाळी मुंबईत आणले आणि दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले. त्या वेळी पुढील तपासासाठी खैरनारला दिल्लीला नेणे आवश्यक असल्याचे सांगून ट्रान्झिट कोठडी सुनावण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली. या प्रकरणात इतर राज्यांतील व्यक्तींचाही सहभाग असण्याची शक्यता सध्या नाकारता येत नाही आणि म्हणूनच खैरनारची पोलिस कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचे सीबीआयने ट्रान्झिट कोठडी सुनावण्याची मागणी करताना न्यायालयाला सांगितले. 

सीबीआयची बाजू ग्राह्य धरून खैरनारला दोन दिवसांची ट्रान्झिट कोठडी सुनावली. दरम्यान, राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मंगळवारी खैरनारला ताब्यात घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Bullet Ride : देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT