मुंबई

इतिहासाच्या खुणा खाणमाफियांच्या विळख्यात

CD

इतिहासाच्या खुणा माफियांच्या विळख्यात
‘पिंज्याची माडी’ मोजतेय शेवटची घटका

विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नालासोपारा, ता. १३ (बातमीदार) ः विरार पूर्वेच्या खदानीत मंगळवारी महसूल मंडळ अधिकारी यांच्यासमोर दगडाने ठेचून खदान माफियांनी आत्माराम पाटील यांची हत्या केली, त्या खदानीच्या वर तब्बल ४८९ वर्षे जुनी ऐतिहासिक ‘पिंज्याची माडी’ उभी आहे. ती आता शेवटच्या घटका मोजत असून माफियांच्या अतिक्रमणात ही ऐतिहासिक वास्तूही गिळंकृत केली जात असल्याने इतिहासतज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
शिरगाव परिसरात मराठ्यांच्या पराक्रमाच्या आठवणी करून देणारी एक ‘पिंज्याची माडी’ आहे. याच माडीच्या खालची सर्व जमीन खदान माफियाने हडप करून सर्व डोंगर पोखरला आहे. पोर्तुगीज काळात या परिसरावर नजर ठेवण्यासाठी आणि रखवालदारीसाठी ही माडी बांधण्यात आली होती. वसईच्या ऐतिहासिक संरक्षण व्यवस्थेचा ती एक महत्त्वाचा भाग मानली जाते. १७३७ ते १७३९ दरम्यान मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसईचा ताबा घेतल्यानंतर ही वास्तू मराठा साम्राज्याच्या नियंत्रणाखाली आली होती; मात्र आज ही ऐतिहासिक माडी दुर्लक्षित अवस्थेत उभी असून उत्खननामुळे तिला धोका निर्माण झाला आहे. सततच्या स्फोटांमुळे परिसर हादरत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. याच बेकायदा दगडखाणीविरोधात आवाज उठवणारे ग्रामस्थ आत्माराम पाटील यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. त्यामुळे दगडखाण माफियांची दहशत आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
...
इतिहासप्रेमींमध्ये संताप
एका बाजूला वसईचा शेकडो वर्षांचा इतिहास जपणारी वास्तू, तर दुसऱ्या बाजूला तिच्याच पायथ्याशी सुरू असलेला विध्वंस यामुळे इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
...
मराठ्यांच्या इतिहासाच्या रणसंग्रामाची आठवण करून देणारी शिरगावची ‘पिंज्याची माडी’ ही ऐतिहासिक आहे. ती आता नेस्तनाबूत होते आहे, हे खूप दुर्दैवी आहे. तिचे संवर्धन व्हायला हवे.
- श्रीदत्त राऊत, इतिहासप्रेमी
...
शिरगावमध्ये ‘पिंज्याची माडी’ ही ऐतिहासिक ओळख आहे. खदान माफियांनी ती उद्ध्वस्त करायला घेतली आहे. आत्माराम काकांना त्याबद्दल मी माहिती दिली होती. तिचे संवर्धन व्हावे म्हणून त्यांनी आवाज उठवला; पण माफियांनी दिवसाढवळ्या त्यांची दगडाने ठेचून हत्या केली.
- कोमल म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Bullet Ride : देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT