सिडको अधिकाऱ्यासह शिपाई एसीबीच्या जाळ्यात
साडेबावीस हजार लाचेची मागणी
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : सिडकोच्या २२.५ टक्के योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या रजिस्ट्रेशनच्या कामासाठी २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना सिडकोचे अधिकारी रामदास जगताप आणि त्यांचा शिपाई हरेश सोनवणे या दोघांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे सिडकोमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे सिडकोच्या २२.५ टक्के विभागातील रजिस्ट्रेशनचे काम प्रलंबित होते. हे काम करून देण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा मूळ पद अपर जिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप (वय ५७) यांनी २२ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत नवी मुंबई एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यावरून बुधवारी सायंकाळी सिडकोच्या सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयात सापळा लावून शिपाई हरेश सोनवणे (वर्ग ४) याला रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीत ही रक्कम अधिकारी रामदास जगताप यांच्या सांगण्यावरून घेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.