पालघर, ता. १४ (बातमीदार) : कामगार व्यवस्थेला अधिक पारदर्शक, सुसंगत आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी केंद्र शासनाने २१ नोव्हेंबर २०२५ पासून चार महत्त्वपूर्ण कामगार संहितांची अंमलबजावणी संपूर्ण भारतात लागू केली आहे. यामध्ये वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२० तसेच व्यावसायिक आरोग्य, सुरक्षा व कामाची स्थिती संहिता २०२० यांचा समावेश असून, विद्यमान २९ कामगार कायदे एकत्र करण्यात आले आहेत. या नव्या संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय नियमांचा मसुदा तयार केला असून, तो https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यांबाबत उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन कामगार उपायुक्त विजय चौधरी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कामगार संहिता नियमांचा मसुदा https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. संबंधित सूचना अथवा हरकती अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर पाठवाव्यात. तसेच mh.labourcodes@gmail.com या ई-मेलवरही अभिप्राय स्वीकारले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.