मुंबई

नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता!

CD

विमानतळ नामकरणाचा प्रश्न पुन्हा चिघळणार
उद्‍घाटन होऊन सात महिने उलटले, तरी जीआर रखडला; प्रकल्पग्रस्त संतप्त
जुईनगर, ता. १४ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विमानतळाचे उद्‍घाटन होऊन सात महिने उलटले, तरी अद्याप नामकरणाबाबतचा कोणाताही शासन निर्णय (जीआर) जारी न झाल्याने प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांमध्ये संतापाची भावना आहे. नवी मुंबई परिसरातील राजकीय नेते आपापल्या राजकीय कामात व्यस्त असून दि. बा. पाटील नामकरणाचा प्रस्ताव पुन्हा अडगळीत पडल्याची चर्चा सध्या प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे आणि रायगड परिसरातील आगरी-कोळी समाज तसेच विविध प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येत ‘सर्वपक्षीय दि. बा. पाटील नामकरण समिती’ स्थापन केली होती. दि. बा. पाटलांच्या नावासाठी यापूर्वी मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटी अशा विविध माध्यमांतून आंदोलन छेडले होते. अनेक वेळा सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली जाईल, अशी आश्वासनेही देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी अधिक तीव्र झाली आहे, तर ठाणे, नवी मुंबई आणि रायगड या तिन्ही ठिकाणचे लोकप्रतिनिधी सरकारमध्ये असतानादेखील नामकरणाला उशीर होत असल्याने भूमिपुत्रांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, नामकरणाचा प्रश्न रखडल्याने आगामी काळात पुन्हा मोठ्या आंदोलनाची हाक दिली जाऊ शकते, अशी चर्चा प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

समाजमाध्यमांवर संताप
समाजमाध्यमांवरही या विषयावर पुन्हा एकदा तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, प्रकल्पग्रस्त नेत्यांचे गुलाम झाले आहेत, नेत्यांकडून नामकरणाचा मुद्दाच विसरला, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. तसेच या सरकारकडून न्यायाची अपेक्षा ठेवू नये, अशी थेट भावना काही प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विमानतळ नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोठा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळाचे नाव स्व. दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देण्यास होत असलेली दिरंगाई बघून मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकते की नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळाचे नाव दुसरे काही देण्याचा डाव तर सरकारचा नसेल ना? इतर विमानतळांना पटापट नाव देण्यात आली मग यालाच उशीर का व्हावा?
- ॲड. निरंत पाटील, प्रकल्पग्रस्त, नवी मुंबई

स्वतः मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली असून, आतापर्यंत नामकरण न केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान नसेल, तर भूमिपुत्रांनी विश्वास कोणावर ठेवायचा, असा प्रश्न पडला आहे. तरी लवकरात लवकर दि. बा. पाटलांचे नाव विमानतळाला देण्यात यावे.
- सोमनाथ म्हात्रे, प्रकल्पग्रस्त, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT