सारसोळे जंक्शन येथे अत्याधुनिक रुग्णवाहिकेची मागणी
नेरूळ, ता. १४ (बातमीदार) ः पाम बीच मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन होऊन घडणाऱ्या भीषण अपघातांचे सत्र सुरूच आहे. यातील जखमींना गोल्डन अवरमध्ये तातडीने उपचार मिळावेत, यासाठी सारसोळे जंक्शन येथे २४ तास कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल मांडवे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सारसोळे जंक्शन हे पाम बीच मार्गाचे केंद्रस्थान असल्याने येथे रुग्णवाहिका तैनात असल्यास वाशी किंवा बेलापूर या दोन्ही दिशांना काही मिनिटांत मदत पोहोचवणे शक्य होईल. या मागणीची दखल घेऊन पालिका प्रशासन पाम बीच मार्गावर ही सुविधा कधी कार्यान्वित करते, याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.