मुंबई

एमआयडीसी भूभाडे भरण्याकडे रहिवाशांची पाठ

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : एमआयडीसी परिसरातील निवासी भूखंडधारकांकडून वार्षिक भूभाडे भरण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. सुमारे ६०० निवासी भूखंड असलेल्या या परिसरात गुरुवार (ता. १४)पर्यंत केवळ ८४ भूखंडधारकांनीच वार्षिक भूभाडे भरले असून, हे प्रमाण अवघे १४ टक्के आहे. त्यामुळे शुक्रवार (ता. १५) हा अखेरचा दिवस असल्याने शेवटच्या दिवशी किती जण भूभाडे भरण्यासाठी पुढे येतात, याकडे लक्ष लागले आहे.

यापूर्वी निवासी भूखंडधारकांना वार्षिक भूभाडे भरण्यासाठी ठाणे एमआयडीसी कार्यालयात जावे लागत होते. यासाठी वेळ आणि पैशाचा अतिरिक्त खर्च होत असल्याने अनेकांनी काही वर्षांपासून भूभाडे भरले नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनने पाठपुरावा केला होता. यानंतर ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी एमआयडीसी अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्पुरत्या स्वरूपात डोंबिवली एमआयडीसी कार्यालयातच भूभाडे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ४ ते १५ मे या कालावधीत ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, या सुविधेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, भविष्यात ही सुविधा कायमस्वरूपी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात आणि ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही एमआयडीसीकडे केली आहे.

अल्प प्रतिसादाची कारणे
अल्प प्रतिसादामागे अनेक कारणे असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. भूभाडे भरण्यासाठी कमी कालावधी देण्यात आला असून, त्यात शनिवार-रविवार कार्यालय बंद असते. तसेच अनेक भूखंडधारकांना आपली थकबाकी किती आहे, याची स्पष्ट माहिती मिळत नसल्याने अंदाजित रक्कम भरावी लागत आहे. त्यानंतर अंतिम पडताळणी ठाणे कार्यालयात होऊन काही दिवसांनी पावती डोंबिवली कार्यालयात येत असल्याने नागरिकांना दोनवेळा कार्यालयात जावे लागत आहे. याशिवाय मेमधील सुट्ट्यांमुळे अनेक रहिवासी गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर गेले आहेत. कडक उन्हाळ्यामुळे ही नागरिक बाहेर पडण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT