मुंबई

बदलापूरात इनडोअर स्टेडियम उभारणार

CD

बदलापूर, ता. १४ (बातमीदार) : क्रीडामय वातावरणात बुधवारी (ता. १३) शहर पूर्णपणे न्हाऊन निघाले, निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्‍घाटनाचे. ऑलिंपिक खेळांना चालना देण्यासाठी अशा स्पर्धांची गरज आहे. बदलापूरमध्ये लवकरच आधुनिक इनडोअर स्टेडियम उभारले जाईल, अशी घोषणा आमदार किसन कथोरे यांनी केली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेला हेंद्रेपाडा येथील बदलापूर जिमखाना मैदानावर दिमाखदार सुरुवात झाली. आमदार कथोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्याधिकारी मारूती गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे संजय नाईक, नीलेश जगताप यांच्यासह राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेळाडूंच्या मिरवणुकीने उद्‍घाटन सोहळ्याला उत्साहपूर्ण सुरुवात झाली. शाहिर नंदेश उमप यांच्या सांस्कृतिक सादरीकरणासह जिम्नॅस्टिकच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी बदलापूर जिमखाना हे शहराचे वैभव असल्याचे सांगत, शहरातील क्रीडांगणांमधून भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांमध्येही मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

क्रीडारसिकांची मोठी गर्दी
१७ मेपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील आठ विभागांतील ३८४ खेळाडू सहभागी झाले असून, १८ व २१ वर्षांखालील युवकांच्या चुरशीच्या लढती प्रथमच बदलापूरकरांना अनुभवता येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल २३ लाख ३५ हजार रुपयांची रोख पारितोषिके, करंडक आणि पदके देण्यात येणार आहेत. कोल्हापूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई आणि नाशिक संघांमध्ये रंगणाऱ्या सामन्यांमुळे बदलापूरमध्ये क्रीडारसिकांची मोठी गर्दी होत आहे.

महाराष्ट्राची शान, खेळाचा महासंग्राम घोषवाक्याने वेधले लक्ष!
राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यात ‘महाराष्ट्राची शान, खेळाचा महासंग्राम’ या स्पर्धेच्या घोषवाक्याचा प्रत्यय प्रत्येक क्षणी अनुभवायला मिळाला. स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेले ‘खेळ दमदार’ हे विशेष गीत आणि आकर्षक लोगो खेळाडू व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. राज्यभरातून आलेल्या खेळाडूंमुळे बदलापूरमध्ये क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवस व्हॉलीबॉलच्या थराराने शहर दुमदुमणार आहे.

Fuel Crisis: आठवड्यात २ दिवस वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग आणि नो व्हेईकल डे... दिल्लीत सरकारचा मोठा निर्णय

शहनाज गिल पडली RCBच्या 'या' क्रिकेटरच्या प्रेमात? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणतात-

"एकदा मोदीसर मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तर.." पंतप्रधानांच्या आवाहनावर मराठी अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट

Pirelli Cyber Tyre : आता टायर झाले स्मार्ट! Cyber Tyre अपघातापूर्वीच देणार अलर्ट; मिळणार हायटेक फीचर्स

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ : मुंबई, लातूरची विजयी घोडदौड सुरू, अटीतटीच्‍या लढतीत पुण्याची नाशिकवर मात

SCROLL FOR NEXT