बदलापूर, ता. १४ (बातमीदार) : गांधी चौक परिसरातील पीएम ब. न. प. डिजिटल स्कूल क्र. १, कुळगाव या पालिका शाळेने दहावी परीक्षेत सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा परीक्षेला २६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. तसेच एका दिव्यांग विद्यार्थीनीने ७० टक्के गुण मिळविले. आशीष मोरे याने ८७.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर उजमा अब्दुल अजीज शेख, धनश्री राठोड, रुतिका रोकडे आणि सुकन्या हुवाळे यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करत त्यांचे कौतुक केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सुरेखा राऊत यांचे मार्गदर्शन, शिक्षकांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचेही घोरपडे यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.