बोनकोडे गावात विद्युत डीपी बॉक्सला आग
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : कोपरखैरणे सेक्टर-१२ परिसरातील बोनकोडे गाव आणि नाईक आळी येथे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशातच, बुधवारी (ता. १३) सायंकाळी बोनकोडे गावात महावितरणच्या डीपी बॉक्सला आग लागली. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
डीपी बॉक्सला लागलेली ही आग सजग नागरिक संजय म्हात्रे यांना दिसताच त्यांनी तातडीने अरविंद यादव यांच्या मदतीने अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. दोघांच्या तत्परतेमुळे काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.
घटनास्थळी डीपी बॉक्सलगत एक चारचाकी आणि रुग्णवाहिका उभी असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता होती. मात्र, प्रसंगावधान राखत दोन्ही वाहने सुरक्षित अंतरावर हलविण्यात आली. त्यानंतर तातडीने महावितरण कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.