मुंबई

गव्हर्नमेंट सर्व्हंट्स पतपेढीच्या भगवान भगत अध्यक्षपदी

CD

टोकावडे, ता. १४ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची हक्काची आर्थिक संस्था म्हणून ओळख असलेल्या गव्हर्नमेंट अँड अंडरटेकिंग गव्हर्नमेंट सर्व्हंट्स पतपेढीच्या अध्यक्षपदी भगवान भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
२००६ मध्ये मुरबाड तालुक्यातील शिक्षकांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने महेश देशमुख, भगवान भगत, योगेश चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत या पतसंस्थेची स्थापना केली होती. सुरुवातीला १०१ सभासद आणि १० हजार रुपयांच्या भागभांडवलातून सुरू झालेली ही पतसंस्था आज २० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. तालुक्यातील शिक्षकांना गरजेच्या वेळी तत्काळ आर्थिक साह्य उपलब्ध करून देण्यात पतसंस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. कोणताही मोबदला न घेता काम करणाऱ्या संचालकांमुळे संस्थेने विश्वासार्हता आणि लौकिक मिळवला आहे. पतसंस्थेच्या संचालक मंडळात भगवान भगत, योगेश चौधरी, मीनाक्षी देशमुख, सरिता विशे, रवींद्र घरत, दिलीप ईसामे, गौतम रातांबे, विष्णू पारधी, अनिल भोईर, राजेंद्र सूर्यराव आणि बबुशा चोरे यांचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी विजयसिंग पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. अध्यक्षपदासाठी भगवान भगत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT