मुंबई

एल. के. हायस्कूलचा दहावीच्या निकालात घवघवीत यश

CD

एल. के. शाळेचे दहावीच्या निकालात घवघवीत यश

मुंबई, ता. १४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात एल. के. शाळेने यंदाही १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

यावर्षी शाळेतून परीक्षेस बसलेल्या एकूण १०३ विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ४२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, तर ४५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त करून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. भाविक भास्कर शिंदेने यंदा ९५ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर त्यानंतर सई सकुंडेने ९४.४० टक्क्यांसह द्वितीय व अथश्री भंडारेने ९३ टक्क्यांसह तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला गोस्वामी, सचिव प्रणिता भारती, मुख्याध्यापक विश्वास निकुंभ, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामागे संस्थेचे सक्षम व्यवस्थापन, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे मुख्याध्यापकनिकुंभ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 'पोलिसांकडे जा, व्यवस्थेवर विश्वास ठेवा', पैगंबरविरोधी वक्तव्य प्रकरणातील याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट संदेश

Kolhapur Inspirational Success Story: यळगुडच्या सरिताची राज्यात झेप! आयुष भरतीत महिला प्रवर्गात चौथा क्रमांक; राजपत्रित अधिकारीपदी निवड

Marathi News Live Updates: गोदावरीचा पूर ओसरला, घाट परिसरात स्वच्छता मोहीम वेगात

आजचे पंचांग ९ जुलै २०२६! गुरुवारचे शुभ मुहूर्त, राहुकाल आणि राशीनुसार चंद्रबळ

Beed Farmer Successful Story : 50 हजारांची नोकरी सोडली अन् 63 व्या वर्षी बीडच्या माळरानावर पिकवलं 'काळं सोनं'; उच्चशिक्षित शेतकऱ्याची दुष्काळावर मात, कसं फिरवलं नशीब?

SCROLL FOR NEXT