मुंबई

भटक्या श्वानांना मिळणार हक्काचे छत्र

CD

भटक्या श्वानांना हक्काचे घर
नवघर येथे निवारा केंद्राची व्यवस्था
वसई, ता. १४ (बातमीदार)ः वसई-विरार शहर पालिकेकडून वसई पूर्वेला नवघर येथे भटक्या श्वानांसाठीचे निवारा केंद्र बांधण्यात येणार आहे. त्यामुळे भटक्या श्वानांचा हक्काचे घर मिळणार आहे.
वसई-विरार शहर पालिकेने मुक्या प्राण्यांच्या आरोग्य, सुरक्षेची हमी घेत महत्वपूर्ण पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने भटक्या श्वानांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी पहिल्या टप्प्यात नवघर येथे शेल्टर उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी एक हजार श्वानांना राहण्याची व्यवस्था केली जाणार असून वैद्यकीय मदतीबरोबर खाण्याची सोय करण्यात येणार आहे.
-------------
४५ खाद्य ठिकाणे
महापौर अजीव पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिलमध्ये श्वानांसाठीचे निवारा केंद्र, लसीकरण, जखमी भटक्या श्वानांना वैद्यकीय मदत, फिडिंग स्पॉट संदर्भात बैठक झाली होती. या वेळी श्वानप्रेमींनी विविध सूचना मांडल्या होत्या. त्यानुसार शहरात ४५ खाद्य ठिकाणे असून, हरकती, सूचनांसाठी मुदत दिली गेली होती.
--------------
भटक्या श्वानांपासून नागरिकांची सुरक्षा तसेच श्वानांचे आरोग्य, त्यांना खाद्य, राहण्याची व्यवस्थेवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार नियोजन केले जात आहे.
-अजीव पाटील, महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT