मुंबई

जनगणनेच्या कामात कसूर

CD

जनगणना प्रशिक्षणाला दांडी भोवली
पालघर नगर परिषदेची ४६ जणांवर कारवाई

पालघर, ता. १४ ः जनगणनेच्या कामात चालढकल केल्याप्रकरणी पालघर नगर परिषदेने ४६ कर्मचाऱ्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. राष्ट्रीय कामात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
जिल्हाभर जनगणनेचे काम सुरू आहे. या कामासाठी प्रग्न पर्यवेक्षक, कर्मचारीवर्गाची नियुक्ती करण्यात आली असून प्रभागांप्रमाणे त्यांना आदेश देण्यात आले आहेत. जनगणनेच्या प्रशिक्षणासह विविध कामे सुरू आहेत; मात्र या कामामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ तसेच प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या ४६ कर्मचाऱ्यांवर पालघर नगर परिषदेने थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला होता. तसेच संदेश पाठवून नोटिसाही देण्यात आल्या होत्या. तरीदेखील कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय कर्तव्यापेक्षा स्वतःच्या सोयीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. त्यामुळे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी कठोर कर्मचाऱ्यांविरोधात पालघर पोलिस ठाणे येथे मंगळवारी (ता. १२) तक्रार दाखल केली आहे.
----------------------
राष्ट्रीय कर्तव्यात कसूर
पालघर नगर परिषद क्षेत्रात आगामी जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. घरगणना करण्यासाठी शहरासाठी १९६ प्रगणकांची आवश्यकता होती. यासाठी स्थानिक शिक्षक, बीएलओ, इतर सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना २४ एप्रिल ते ९ मे कालावधीत विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते; मात्र कर्मचारी वर्ग अनुपस्थित राहिल्याने ही कारवाई केल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT