मुंबई

मातोश्रीनगर परिसर पथदिव्यांनी उजळला

CD

कल्याण, ता. १४ (बातमीदार) : पूर्वेतील विजयनगर प्रभागातील मातोश्रीनगर परिसरात नागरिकांच्या सुरक्षेच्या आणि सोयीच्या दृष्टीने नव्याने बसविलेल्या पथदिव्यांचे लोकार्पण नुकतेच उत्साहात पार पडले. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या हस्ते या पथदिवे सुरू करण्यात आले. पथदिव्यांमुळे मातोश्रीनगर परिसर प्रकाशमान झाल्याने असून रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
मातोश्रीनगर भागात रात्रीच्या वेळी अंधार असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अंधारामुळे चोरीच्या घटना, अपघातांची भीतीही नागरिकांमध्ये होती. ही समस्या ओळखून शिवसेना उपविभागप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते सुमेध हुमणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत प्रशासनाकडून आधुनिक पथदिवे बसविण्यात आले. लोकार्पणप्रसंगी बोलताना नगरसेवक महेश गायकवाड म्हणाले, सामान्य नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांना नेहमीच प्राधान्य राहिले आहे. पथदिव्यांमुळे केवळ रस्ते उजळणार नाहीत, तर परिसरातील सुरक्षितताही वाढण्यास मदत होईल. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असून आगामी काळातही अशी लोकोपयोगी कामे सुरू राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT