मुंबई

नेरूळमधील शाळा व अंगणवाडीची दयनीय अवस्था

CD

नेरूळमधील शाळा व अंगणवाडीची दयनीय अवस्था
पालक-विद्यार्थ्यांत संताप
जुईनगर, ता. १४ (बातमीदार) : नेरूळ येथील शाळा क्रमांक १० कै. मारुती बाळू भगत तसेच समोर नव्याने उभारण्यात आलेल्या ‘हिराजी गणू पाटील’ अंगणवाडीची अत्यंत दयनीय अवस्था उघडकीस आल्याने पालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शाळेतील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, सूचना फलक तसेच इतर आवश्यक सुविधा अत्यंत खराब अवस्थेत असल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असून तुटलेल्या व अपुऱ्या सुविधा विद्यार्थ्यांना वापराव्या लागत आहेत. विशेषतः स्वच्छतागृहांची दुरवस्था चिंताजनक असून, अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, समोरच नव्याने बांधण्यात आलेल्या ‘हिराजी गणू पाटील’ अंगणवाडीची उद्‍घाटनापूर्वीच झालेली दुर्दशा ही गंभीर बाब समोर आली आहे. इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निकृष्ट कामाबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक प्रीती भोपी तसेच क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण विभागाचे सभापती गिरीश म्हात्रे यांनी संबंधित ठिकाणी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चौकट :
प्रशासनाचे दुर्लक्ष
नेरूळ येथील शाळा व अंगणवाडीच्या दयनीय अवस्थेमुळे पालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, त्या सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. मात्र, प्रत्यक्ष स्थिती पाहता प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन दुरुस्तीची कामे करावीत, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कोट :
विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची कमतरता स्पष्टपणे जाणवली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुधारणा तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दर्जेदार सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही.
— गिरीश म्हात्रे, सभापती, क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT