मुंबई

बाजार समिती सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

CD

बाजार समिती सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
सचिवांची त्वरित कारवाई
जुईनगर, ता. १४ (बातमीदार) : मुंबई बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मसाला मार्केटमधील इ-२० गाळ्यात विनापरवानगी पोटमाळा उभारण्याचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू होते.
परिसरात कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्ही बंदोबस्त असतानाही मोठ्या प्रमाणात लोखंड, सिमेंट आणि इतर साहित्य गेटमधून बाजारात आणण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामाला परवानगी नसताना बांधकाम साहित्य बाजारात येत असली तर भविष्यात स्फोटक वस्तू बाजारात सहज येऊ शकते, अशी चर्चा बाजार परिसरात रंगू लागली आहे. शिवाय या स्फोटक वस्तूने मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर असलेल्या बाजार आवारात गंभीर घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल बाजार घटकाकडून केला जात आहे.
तर परवानगी नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य बाजार आवारात दाखल कसे झाले? दोन मजली बांधकाम, पोटमाळा बांधकाम तीन दिवसांपासून सुरू असताना प्रशासनाला त्याची माहिती नव्हती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत, तर बाजार समिती सचिवांना याबाबत माहिती मिळताच यावर त्वरित कारवाई करण्यात आली आहे.
अनधिकृत बांधकाम, अवैध व्यापार आणि सेस चोरी रोखण्यासाठी सचिव शरद जरे यांनी पाचही मार्केटमध्ये विशेष पथके नेमल्याची घोषणा केली होती. फळ व भाजीपाला मार्केटमध्ये आवक-जावक तपासणीसाठी शिफ्टनिहाय ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, बाजार आवारातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी सहसचिवांच्या नेतृत्वाखाली विशेष अतिक्रमण पथकही स्थापन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कार्यात पथकाचा सध्या अभाव दिसत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणाबाबत कळल्यानंतर आम्ही लगेच कारवाई केली आहे. संबंधित गाळा आणि बांधकाम साहित्य तत्काळ सील करण्यात आले आहे.
- शरद जरे, सचिव, बाजार समिती मुंबई .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT