शहरात लहान कचराकुंड्या चोरीला
लिटल बिन्स घरातल्या कचऱ्यानेच भरल्या
वाशी, ता. १४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये लावण्यात आलेल्या छोट्या कचराकुंड्यांमध्ये घरातला कचरा टाकला जात आहे, तर काही ठिकाणी या कचराकुंड्या चोरील्या गेल्याचेदेखील प्रकार निर्दशनास येत आहे. पालिका क्षेत्रात जवळपास ५०० पेक्षा अधिक छोट्या कचरारकुंड्या रस्त्याच्या बाजूला बसवण्यात आल्या आहे. मात्र, या लिटल बिन्सकडे नागरिकांनीदेखील कचरा टाकण्यासाठी पाठ फिरवली आहे, तर काही नागरिकांनी या लिटल बिन्समध्ये घरातील कचरा आणून भरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नवी मुंबई शहर स्वच्छ रहावे यासाठी पालिकेने विविध योजना राबवल्या आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांंनी कचरा करुन घाण करू नये, यासाठी पालिकेने शहरामध्ये सार्वजनिक विविध ठिकाणी ५०० पेक्षा अधिक छोट्या कचराकुंड्या बसवल्या आहेत. पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर बनवण्यासाठी कचराकुंड्या हटवल्या आहे. त्यामुळे रस्त्याने जाता-येता किरकोळ कचरा टाकण्यासाठी छोट्या कचराकुंड्या बसवलेल्या असताना यामध्ये घरातील असणारा कचराच आणून टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या या कचराकुंड्या गर्दुल्ल्यांकडून चोरण्याचेदेखील प्रकार निदर्शनास आले आहे.
चौकट
छोट्या कचराकुंड्यांत घरगुती कचरा
रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी रस्त्यामध्ये कचरा टाकून घाण करू नये, यासाठी शहरामध्ये पालिकेने लिटल बिन्स बसवल्या आहेत, पण शहरातील कचराकुंडीमुक्त शहर करत असताना लिटल बिन्स हीच कचराकुंडी समजून त्यामध्ये कचरा आणून टाकत आहे.
चौकट
चोरीचे वाढते प्रमाण
नवी मुंबई महापालिकने बसवलेले लिटल बिन्स हे गुर्दल्ल्यांकडून चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत, तर सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये, यासाठी लिटल बिन्स बसवलेले असताना घराजवळील असणाऱ्या लिटल बिन्समध्ये घरातील मोठा कचरा आणून टाकतात. त्यामुळे लिटल बिन्स तत्काळ भरतात. असे पालिकेच्या एका स्वच्छता अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
कोट
नवी मुंबई महापालिके स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्न करत आहे. नवी मुंबईकरांनीदेखील याला सहकार्य करणे आवश्यक आहे. घरातील कचरा हा वेळेत येणाऱ्या कचरागाडीमध्ये नेऊन टाकावा. तसेच लीटल बीन्स मध्ये घरगुती कचरा आणून टाकू नये. लिटल बिन्सचे डबेदेखील काही समाजकंटक चोरी करत आहेत.
डॉ. अजय गडदे, उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.