मुंबई

नाट्य विद्यापीठ सुरू करण्याचा प्रयत्न

CD

नाट्य विद्यापीठ सुरू करण्याचा प्रयत्न
‘लोकरंगनायक’ प्रकाशन सोहळ्यात आशीष शेलार यांची घोषणा

मुंबई, ता. १४ : राज्यात स्वतंत्र ‘नाट्य विद्यापीठ’ आणि ‘लोककला संशोधन केंद्र’ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी केली. लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे लिखित आणि ग्रंथाली प्रकाशित ‘लोकरंगनायक’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (ता. १२) पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे प्रकाशित झाले, या वेळी आशीष शेलार यांनी उपस्थितांना संबोधित केले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे माजी सदस्य आणि संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार, पद्मश्री वामन केंद्रे, नाटककार अभिराम भडकमकर, लावणीसम्राज्ञी राजश्री नगरकर आणि ज्येष्ठ चित्रपट तसेच नाट्य अभिनेते शिवाजी साटम उपस्थित होते. आपल्या भाषणात आशीष शेलार म्हणाले की, महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची ओळख जागतिक स्तरावर असून, ती अधिक अधोरेखित करण्यासाठी लोककलांच्या संशोधनासाठी स्वतंत्र केंद्र उभारण्याचा तसेच नाट्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल. उल्हासदादा पवार यांनी वारकरी परंपरा आणि लोककला या दोन्हींचा आपल्या आयुष्यातील प्रभाव सांगत आशीष शेलार यांनी वामन केंद्रे आणि डॉ. खांडगे यांच्या सूचनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना आशीष शेलार म्हणाले की, डॉ. प्रकाश खांडगे यांनी आयुष्यभर लोककलेसाठी समर्पित भावनेने कार्य केले असून, त्यांच्या आणि वामन केंद्रे यांच्या सूचनांचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून निश्चित विचार करून त्यासाठी प्रयत्न केले जातील. या कार्यक्रमाला कालनिर्णयकार जयराज साळगावकर, भारुडकार चंदाबाई तिवारी, प्रभाकर ओव्हाळ, संजय नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.


--------------
वाचक चळवळ
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. शिवाजी वाघमारे आणि शाहीर यशवंत जाधव यांनी शाहीर आत्माराम पाटील आणि शाहीर साबळे यांच्या पोवाड्यांचे सादरीकरण केले. ग्रंथालीचे प्रमुख सुदेश हिंगलासपुरकर यांनी प्रास्ताविकात ‘ग्रंथाली’ ही केवळ व्यावसायिक प्रकाशन संस्था नसून सामाजिक बांधिलकी जपणारी वाचक चळवळ असल्याचे सांगितले. राजश्री काळे नगरकर यांनी डॉ. खांडगे यांचे लोककलेतील कार्य अतुलनीय असल्याचे नमूद केले. अभिराम भडकमकर म्हणाले की, ‘लोकरंगनायक’ हे पुस्तक केवळ लोककलावंतांचे चरित्रलेखन नसून त्यात लोककलांची सैद्धांतिक आणि अनुभवसिद्ध मांडणी आहे. प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हे पुस्तक वाचले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT