मुंबई

पालघरच्या दक्ष जगतापची टॅलेंट सर्च स्पर्धेत चमकदार कामगिरी

CD

दक्षची प्रतिभा शोध स्पर्धेत चमकदार कामगिरी
राज्य स्तरावर ११७ वा, जिल्हा स्तरावर चौथा, तर केंद्रात प्रथम क्रमांक

पालघर, ता. १४ : महाराष्ट्र एड्यूमीट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत टॅलेंट सर्च’ स्पर्धेत पालघर येथील १० वर्षीय दक्ष सचिन जगताप याने उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत दक्षने १५० पैकी ११६ गुण मिळवत ७७.३३ टक्के गुण प्राप्त केले. त्याच्या या यशामुळे त्याला राज्य स्तरावर ११७ वा क्रमांक, जिल्हा स्तरावर चौथा, तसेच केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे.

दक्ष हा आनंद आश्रमशाळेचा विद्यार्थी असून, लहान वयातच त्याने विविध शैक्षणिक व कलात्मक क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले असून, त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. लहानपणापासूनच दक्षला चित्रकलेची विशेष आवड असून, त्याने विविध चित्रकला स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ऑल इंडिया आर्ट टॅलेंट कॉन्टेस्ट ई-लोकेशन कॉम्पिटिशन ‘स्पेलिंग बी एलिमेंटरी’ तसेच गणित विषयातील ‘अबॅकस’ प्रशिक्षणामध्येही त्याने विशेष प्राविण्य मिळवले आहे. शाळास्तरीय तसेच सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे आणि विविध संघटनांतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चित्रकला स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्याने अनेक पारितोषिके आणि प्रमाणपत्रे मिळवली आहेत.

यापूर्वीही भारत टॅलेंट सर्च आणि कला चिल्ड्रन अकॅडमीतर्फे आयोजित टॅलेंट कॉन्टेस्ट परीक्षेत अव्वल गुण मिळवत दक्षने यश संपादन केले होते. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे त्याचा सन्मानही करण्यात आला होता. दक्षच्या यशामुळे त्याचे कुटुंब, शाळा आणि पालघर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही तो विविध क्षेत्रांत मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; पण रक्कम पाहून महिलांना बसला धक्का!

HBA Interest Rate: घर खरेदी-बांधणीसाठी स्वस्त कर्जाचा फायदा कायम! HBA व्याजदरात वाढ नाही; सरकारचा मोठा निर्णय

"आम्ही विभक्त होतोय" अखेर मौनी आणि सूरजने घटस्फोटावर सोडलं मौन ! पण नेटकऱ्यांनी धरलं या अभिनेत्रीला जबाबदार

Deglur Police : राजकीय व्यासपीठावरील शुभेच्छांचा फटका; देगलूरचे पोलीस निरीक्षक मुंडे बदली

Beed News: बीडमध्ये पंडित शिरले, क्षीरसागर चांगलेच तापले! नेमकं काय घडलं? बघाच..

SCROLL FOR NEXT