संभाजी महाराजांचे स्मारक बांधण्याची मागणी
मनसे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांच्याकडून निवेदन
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सानपाडा येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बांधण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवी मुंबई महापालिकेचे महापौर, उपमहापौर व आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली.
सानपाडा सेक्टर आठ येथे सानपाडा पोलिस ठाणे (जुने) समोरील चौकाचे नवी मुंबई महापालिकेने १६ जानेवारी २००५ रोजी धर्मवीर संभाजी महाराज चौक असे नामकरण केले; मात्र २१ वर्षे उलटली तरी अद्याप सदर चौकात छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मारक बसविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करण्यात आलेले नसल्याचे मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापौर, उपमहापौर व आयुक्त यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंती तसेच पुण्यतिथीनिमित्त शिवशंभू भक्त व शिवशंभूप्रेमींना संभाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी तसेच महाराजांना अभिवादन करण्यासाठी बाहेर जावे लागते. तसेच या ठिकाणी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मारक नसल्याने आजही सदर चौक सानपाडा पोलिस ठाणे (जुने) किंवा सानपाडा पेट्रोल पंप म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे या चौकाची आता ओळख पुसली जात असल्याचे मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी पत्रात सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.