मुंबई

कोगदे गावात ‘गवत्या’तून आदिवासी इतिहासाचे जतन

CD

कोगदे गावात ‘गवत्या’तून आदिवासी इतिहासाचे जतन

जव्हार, ता. १४ (बातमीदार) : आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावातही आदिवासी समाजाने आपल्या पारंपरिक संस्कृती व चालीरीतींचे जतन करण्याची परंपरा कायम राखली असून, जव्हार तालुक्यातील कोगदे गावात विवाहसोहळ्यात बुधवारी (ता. १३) मध्यरात्री काढल्या जाणाऱ्या ‘गवत्या’च्या माध्यमातून आदिवासी इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे.

आदिवासी विवाह परंपरेतील ‘गवत्या’ हा केवळ एक विधी नसून पूर्वजांपासून चालत आलेल्या संस्कृती, सामाजिक परंपरा आणि इतिहासाचे जिवंत प्रतीक मानले जाते. वधू-वरांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांच्या सहभागातून पारंपरिक पद्धतीने हा विधी पार पडतो. संबळ, तारपा, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि ग्रामस्थांचा सामूहिक सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण सांस्कृतिक रंगांनी नटलेले दिसून येते. ‘गवत्या’मधून आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले नाते, पूर्वजांच्या स्मृती आणि सामाजिक ऐक्य अधोरेखित होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या परंपरेतून नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि इतिहासाची ओळख करून दिली जाते.
-------------------
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक पारंपरिक चालीरिती लोप पावत असताना आदिवासी भागात मात्र अशा परंपरा आजही जपल्या जात आहेत. त्यामुळे आदिवासी संस्कृतीची वेगळी ओळख आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘गवत्या’सारख्या परंपरांमधून होत असल्याचे चित्र कोगदे गावात पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT