दादरमध्ये शस्त्रक्रिया तपासणी शिबिर
प्रभादेवी (बातमीदार) : अपघात, आजार किंवा इतर कारणांमुळे हात किंवा पाय गमावलेल्या दिव्यांग व्यक्तींना पुन्हा चालण्याची क्षमता मिळावी यासाठी दादरमध्ये दिव्यांग शस्त्रक्रिया तपासणी व थ्रीडी प्रिंटेड जपानी आणि जर्मन तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम अवयव मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नारायण सेवा संस्थानतर्फे श्री राधा कृष्ण चॅरिटेबल फाउंडेशनच्या सहकार्याने रविवारी (ता. १७) सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत दादर (पूर्व) येथील नायगाव क्रॉस रोडवरील वडाळा उद्योग भवनजवळील निको हॉल येथे विनामूल्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात अनुभवी ऑर्थोटिस्ट आणि प्रोस्थेटिस्ट तज्ज्ञांचे पथक तपासणी करून उच्च दर्जाचे, हलके व टिकाऊ नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी अचूक मोजमाप घेणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. या शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांगांनी भाग घ्यावा, असे आवाहनही संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.