मुंबई

विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर भूसंपादनातील शेतकऱ्यांना मोबदला मिळणार

CD

विरार-अलिबाग कॉरिडॉरग्रस्त
शेतकऱ्यांचा मोबदल्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ : राज्यातील महत्त्वाकांक्षी विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना प्रलंबित मोबदला तातडीने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर विशेष बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मोबदला वितरणाची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉर प्रकल्पासाठी शेकडो हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून, काही शेतकऱ्यांना २०२४ मध्ये मोबदला मिळाला होता. मात्र, प्रशासकीय अडचणींमुळे उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे रखडले होते. आता मोबदला वितरण पुन्हा सुरू होत असताना रक्कम कमी मिळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी, पूर्वी ज्या दराने मोबदला देण्यात आला त्याच प्रमाणात किंवा अधिक मोबदला देण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा या प्रकल्पावर परिणाम होतो का, याची तपासणी करण्याचीही मागणी त्यांनी केली.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आवश्यक असल्यास कॅबिनेट पातळीवर निर्णय घेण्याबाबतही सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT