मुंबई

स्पर्धा परीक्षेत राखीवच्या सवलती घेतल्यास खुल्या जागेचा अमान्य

CD

उमेदवार नियुक्तीसाठी धोरणाला मान्यता

मुंबई, ता. १४ ः स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी याआधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणास गुरुवारी (ता. १४) मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवड होणाऱ्या उमेदवारांबाबत स्पष्टता निर्माण होणार आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि सुसंगती येणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
राखीव प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी (परीक्षा शुल्क ही बाब वगळून) या पात्रतेच्या निकषांमध्ये कोणतीही सवलत घेतली नाही, अशा उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातूनही करण्यात येणार आहे.
तथापि, ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी (परीक्षा शुल्क ही बाब वगळून) संधीमध्ये शासनाने दिलेली सवलत घेतलेली असेल, अशा उमेदवारांची गणना संबंधित राखीव प्रवर्गातच करण्यात येईल. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदांवर दावा करता येणार नाही, असेही या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रकला धडकल्यानंतर पेटली बस, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू; २२ जण जखमी

Vijaya Mehta : रंगभूमीचा दीपस्तंभ निमाला! ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT