मुंबई

डॅशबोर्ड प्रणाली

CD

रुग्णालयांमध्ये डॅशबोर्ड प्रणाली
आरोग्य समिती अध्यक्ष भांदिर्गे यांची माहिती

मुंबई, ता. १४ ः मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना सेवा आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठातांसोबत आरोग्य सेवांबाबत महत्त्वपूर्ण बैठक आज पालिका मुख्यालयातील आरोग्य समितीच्या दालनात समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे तसेच पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते.

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा, मोफत उपचार योजना, तसेच भविष्यात राबवण्यात येणाऱ्या प्रभावी उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे, हेच प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून विनाखर्च चांगल्या सुविधा सामान्य नागरिकांपर्यंत कशा पोहोचवता येतील, याविषयी चर्चा झाल्याची माहिती आरोग्य समिती अध्यक्ष भांदिर्गे यांनी दिली. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॅशबोर्ड प्रणाली सुरू करण्याबाबत चर्चा झाली. रुग्णांना दिली जाणारी आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णांना मिळणार दिलासा
झीरो प्रिस्क्रिप्शन उपक्रम, रुग्णांसाठी लागणारी वैद्यकीय मशिनरीची उपलब्धता, औषधांचा पुरेसा साठा, सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम व मजबूत करणे, डॉक्टर आणि नर्सेस यांच्या विविध समस्या, याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच तोडगा काढण्याचा निर्णय झाला, त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT